Bandhkam Kamgar Yojana
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Created by Ashwin, 08 April 2025

AMP Group Links
व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

Bandhkam Kamgar Yojana : महाराष्ट्र सरकार तर्फे घर बांधण्यासाठी किंवा घेण्यासाठी 02 लाख ते 06 लाखाचे लोन किंवा आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे यामध्ये जर तुम्ही नोंदणी केली असेल तर हे कर्ज तुम्हाला सहज मिळू शकते.

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे हे लोन दिले जात असून त्यासाठी तुम्हाला नोंदणी करणे आवश्यक आहे, जर तुम्ही बांधकाम कामगार किंवा इतर कामगार असाल तर तुम्हाला खालील दिलेल्या लिंक वरून आपली नोंदणी करायची आहे.

आणि त्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभांमध्ये तुम्हाला घर बांधण्यासाठी सहा लाखाची लोन ची व्यवस्था महाराष्ट्र सरकारने केलेले आहे.

या आर्थिक योजनेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर खाली दिलेल्या पीडीएफ मधील फॉर्म भरून तुम्हाला संबंधित विभागात जमा करायचा आहे, जर तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये नोंदणी केलेली नसेल तर हे लाभ तुम्हाला मिळणार नाहीत.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा
टेलिग्राम ग्रुप जॉईन व्हा

त्यामुळे आपली नोंदणी कमीत कमी खर्चात करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता

नियम व अटी

  • कामगार हा 18 ते 60 वयाच्या दरम्यान असावा.
  • कामगाराने मागील एका वर्षात कमीत कमी 90 दिवस काम केलेलं असावे.

कामगार नोंदणीची प्रोसेस पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्जा सोबत हे कागदपत्रे जोडावेत

  • वयाचा दाखला
  • 90 दिवस काम केल्याचा दाखला
  • रहिवासी पुरावा
  • ओळखपत्र
  • तीन पासपोर्ट साईज फोटोग्राफ

ही नोंदणी तुम्ही फक्त 25 रुपयात करू शकणार असून ही नोंदणी करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर तुम्हाला जायचं आहे वर नमूद केलेली सर्व कागदपत्रे तुमच्याकडे आहेत याची खात्री सर्वप्रथम तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुमची पात्रता तपासून तुम्ही कामगार नोंदणी करू शकणार आहात.

अशी करा नोंदणी (MAHABOCW Home Loan Yojana)

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला कागदपत्राचा तपशील दिला जाईल ती कागदपत्रे तुम्हाला सोबत ठेवायचे आहेत आणि इथे वेगवेगळ्या कामाविषयीच्या तपशील दिलेला आहे त्या कामांमध्ये तुम्ही काम करत आहात का नाही याची खात्री करायची आहे.

त्यानंतर तुमची पात्रता तपासण्यासाठी तुमची जन्मतारीख टाकायची आहे. 90 दिवसां जास्त काळ काम केले आहे इथे तुम्हाला टिक करायच आहे. तुमच्याकडे निवासी पुरावा आहे का तिथे टिक करायचा आहे, आणि आधार कार्ड आहे का तिथं तुम्हाला टिक करायचा आहे.

ते टिक केल्यानंतर तुम्ही पात्रता तुमची तपासू शकता त्यानंतर तुम्हाला जवळचा जिल्हा निवडायचा आहे तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये काम करताय, तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सध्या वापरत असलेला मोबाईल नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे.

ते टाकल्यानंतर तुमच्या सविस्तर डिटेल्स त्या फॉर्ममध्ये भरायचे आहे, तुमच्याकडे पीएफ नंबर आहे का नाही, किंवा ईमेल आयडी, तुमचे नाव, तुमचा पत्ता ही माहिती त्यामध्ये भरायची आहे आणि तुमचे रजिस्ट्रेशन फक्त 25 रुपयांमध्ये करून घ्यायचे आहे.

हे रजिस्ट्रेशन केल्यानंतर या मंडळाच्या विविध योजना आहेत त्या योजनेचा लाभ तुम्ही सहज घेऊ शकणार आहात अशीच वर नमूद केलेली होम लोन ची योजना आहे त्यासाठी सुद्धा फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरून संबंधित विभागास किंवा कार्यालयात तुम्ही हा फॉर्म सादर करायचा आहे.

होम लोनचा अर्ज  डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts