DCCB Bank Bharti 2025 : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित मध्ये लिपिक,शिपाई,द्वितीय श्रेणी अधिकारी पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह बँकेच्या संकेतस्थळावर अर्ज सादर करायचे आहेत.तुम्ही सुद्धा या पदभरतीसाठी इच्छुक असाल तसेच पात्रता धारण करत असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करा तसेच ऑनलाईन अर्ज ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणाहून अर्ज सुद्धा करू शकता.
DCCB Bank Recruitment 2025 Details
◾भरतीचा विभाग : हि भरती जिल्हा सहकारी बँके मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सहकारी बँकेत नोकरी
◾पदांचे नाव : लिपिक, शिपाई आणि अधिकारी
◾शैक्षणिक पात्रता : उमेदवार 10वी,12वी व पदवीधर असणे आवश्यक आहे (मूळ जाहिरात वाचावी)
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन पद्धतीने जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावेत.
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा ,कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. |
पदांचे नाव व आवश्यक अर्हता (DCCB Bank Bharti Post Details)
◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️लिपिक – 47 जागा
1]कोणत्याही शाखेचा पदवीधर (मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी परिक्षा पास असावा) आणि एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण.
2]वाणिज्य शाखेचा पदवीधर/ पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपीक / वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य.
3]त्याचप्रमाणे इंग्रजी / मराठी टंकलेखन, लघुलेखनाची परीक्षा उत्तीर्ण असल्यास प्राधान्य.
4]वयोमर्यादा – कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षे
▪️शिपाई – 25 जागा
1]कमीत कमी १०वी उत्तीर्ण आवश्यक
2]त्याचप्रमाणे इंग्रजी व संगणकाचे प्राथमिक ज्ञान असावे.
3]वयोमर्यादा – कमीत कमी 21 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षे
▪️द्वितीय श्रेणी अधिकारी – 05 जागा
1]कोणत्याही शाखेचा पदव्युत्तर (मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर परिक्षा पास असावा) आणि एम.एस.सी.आय.टी. किंवा तत्सम परिक्षा उत्तीर्ण प्राधान्यकृत पात्रता MBA/ JAIIB/ CAIIB/ GDC आणि कम्प्युटरचे कार्यरत ज्ञान/बैंकिंग आणि संबंधित क्रियाकलापांमधील अनुभव
2]किमान ३ वर्षाचा बैंकिंग अनुभव.
3]वयोमर्यादा – कमीत कमी 25 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्षे.
इतर आवश्यक माहिती (DCCB Bank Bharti other information)
◾एकूण पदसंख्या : 77 जागा
◾अर्ज करण्याची शेवटची तारीख : अर्ज ऑनलाईन 30 जानेवारी 2025 पूर्वी सादर करावेत.
◾निवड प्रक्रिया : ऑनलाईन पद्धतीने संगणकावर परीक्षा घेण्यात येईल.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://gondiadccb.co.in/
महत्वाच्या सूचना (DCCB Bank Jobs important Instruction)
◾उमेदवारांनी या नोकरभरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी बँकेच्या gondiadccb.co.in किंवा gondiadccb.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बंधनकारक राहील. परीक्षा शुल्क रक्कम रु. ७५० + १८ टक्के जी.एस.टी. रु. १३५/- अशी एकूण रक्कम रु. ८८५/-ऑनलाईन पद्धतीने भरावयाची आहे. या व्यतिरिक्त उमेदवारांचे लेखी अर्ज व परीक्षा शुल्क बँकेच्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष स्विकारले जाणार नाहीत व हे अर्ज ग्राहय धरले जाणार नाहीत.
◾उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना स्वतःचा ईमेल आयडी, मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक नमूद करणे आवश्यक आहे..
◾उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरतांना ज्या पदासाठी तो अर्ज करीत आहे त्या पदासाठी आवश्यक असणारी पात्रता धारण करीता असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा. पात्र व अपात्र अर्जाबाबतची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध राहील.
◾सदर भरती प्रक्रिये दरम्यान बँकेच्या संकेत स्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या अद्यावत माहितीचे अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.
PDF जाहिरात व अर्जाची लिंक (DCCB Bank Vacancies Advertisement & Application)
💻ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |