KDMC Bharti 2025 : कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्रता धारक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.हे अर्ज इच्छुक तसेच पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर सादर करायचे आहेत. गुणांकन पद्धतीने नुसार हि पदे भरायचे असून यासाठी 28 जानेवारी 2025 ही शेवटची तारीख ठेवण्यात आलेली आहे.
KDMC Recruitment 2025 Details
◾भरतीचा विभाग : हि भरती कल्याण डोंबिवली महानगरपालिके मध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
◾भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी.
◾पदांचे नाव : वेगवेगळ्या पदांसाठी भरती आहे (मूळ जाहिरात वाचावी)
◾शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून पात्रताधारक उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
◾अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
◾वयोमर्यादा : कमीत कमी 18 वर्ष व जास्तीत जास्त 65 वर्ष (शिथिलतेसाठी मूळ जाहिरात वाचावी)
🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा, या भरतीकरिता कोणासोबत सुद्धा आर्थिक व्यवहार करू नये.
पदांचे नाव व आवश्यक अर्हता (KDMC Bharti Post Details)
▪️प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 4 जागा
1]शैक्षणिक पात्रता:10वी,12वी व मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदविका उत्तीर्ण आवश्यक.
2]अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
3]दरमहा उमेदवाराला 17000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
▪️वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा प्रशिक्षक – 03 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अथवा पदविका उत्तीर्ण आवश्यक.
2]अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
3]दरमहा उमेदवाराला 20000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
▪️वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक – 04 जागा
1]शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी अथवा पदविका उत्तीर्ण आवश्यक.
2]अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
3]दरमहा उमेदवाराला 20000 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
▪️टीबी हेल्थ पर्यवेक्षक – 06 जागा
1]शैक्षणिक पात्रता: 10वी,12वी व मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदविका उत्तीर्ण आवश्यक.
2]अनुभवी उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
3]दरमहा उमेदवाराला 15500 रुपये एवढे मानधन देण्यात येईल.
इतर आवश्यक माहिती (KDMC Bharti other information)
◾नोकरीचे ठिकाण : कल्याण डोंबिवली
◾निवड प्रक्रिया : शिक्षण,अनुभव व प्राप्त गुणांवर आधारित गुणांकन पद्धतीने निवड केल्या जाईल.
◾अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज स्वीकारले जातील.
◾अर्ज स्वीकारण्याचा पत्ता : आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, कै. शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (पश्चिम), ता. कल्याण, जि.ठाणे
◾उमेदवार अर्ज जमा करताना स्वतः उपस्थित असणे अपेक्षित आहे, कोणत्याही परिस्थितीत अन्य व्यक्ती/नातेवाईक यांचे कडून उमेदवाराचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
◾अधिकृत संकेतस्थळ : https://kdmc.gov.in/
महत्वाच्या सूचना (KDMC Jobs important Instruction)
◾सोबतच्या नमुन्यातील परिपुर्ण भरलेला अर्ज आणि खालील कागदपत्रांसह उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहावे. (पासपोर्ट साईज २ फोटो, फोटो आयडी. मतदान ओळखपत्र/आधारकार्ड इत्यादी, जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र व मार्कशिट (शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका आवश्यक आहे.) अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, वैधता प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, मुलाखतीच्या अनुषंगाने इतर कागदपत्र यांच्या मुळ व सत्यप्रत साक्षांकित प्रती).
◾कोणत्याही सबबीवर मूळ कागदपत्रांशिवाय पात्र ठरविले जाणार नाही याची नोंद घ्यावी. तसेच सादर केलेल्या कागदपत्रांपैकी कोणतेही कागदपत्र खोटे/चुकीचे आढळल्यास संबंधित उमेदवाराची नियुक्ती संपुष्टात आणण्यात येईल. तसेच अर्ज दाखल करण्यास उपस्थित राहिल्याबद्दल उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे प्रवासभाडे अथवा भत्ता देय राहणार नाही.
◾सदरहू पदे (NTEP) एनटीईपी सोसायटी अंतर्गत असल्याने त्यांचा कल्याण डोंबिवली महापालिका आस्थापनेशी कोणत्याही प्रकारचा संबंध राहणार नाही. तसेच निवड होणा-या उमेदवारास कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील कोणत्याही पदावर हक्क सांगणेकामी कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नाही.
◾) अनुभवाच्या बाबतीत फक्त शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/राष्ट्रीय आरोग्य अभियान अथवा राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत असणारा अनुभव ग्राहय धरण्यात येईल.
PDF जाहिरात व अर्जाची लिंक (KDMC Vacancies Advertisement & Application)
📬व्हाट्सअप चॅनेल | येथे क्लिक करा |
💻अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
📑PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
🖱️अधिक माहिती | येथे क्लिक करा |