Lekha Koshagar Vibhag Bharti 2025 : लेखा व कोषागारे पुणे आणि नागपूर विभागांतर्गत कनिष्ठ लेखापाल पदासाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या सहसंचालक लेखा व कोषागारे पुणे विभाग, पुणे या प्रादेशिक विभागांतर्गत सहसंचालक कार्यालय पुणे, कोषागार कार्यालय पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर आणि नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली व चंद्रपूर कार्यालयामध्ये कनिष्ठ लेखापाल पदासाठी ही भरती राहणार आहे. इच्छुक उमेदवार आणि तुम्ही सुद्धा या पद्धतीसाठी इच्छुक तसेच पात्र असाल तर खालील लिंक करून पीडीएफ मधील जाहिरात व्यवस्थित रित्या वाचून ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा.

Mahakosh Recruitment 2025 Details

भरतीचा विभाग :लेखा व कोषागारे पुणे व नागपूर अंतर्गत हि भरती जाहीर करण्यात आलेली आहे.

भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची चांगली संधी.
पदांचे नाव : कनिष्ठ लेखापाल
शैक्षणिक पात्रता : पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून अर्जदाराने सविस्तर जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : इच्छुक व पात्र उमेदवाराने ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा. कोणत्याही भरतीसाठी आर्थिक व्यवहार करू नये.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता (Mahakosh Bharti Post Details)

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️कनिष्ठ लेखापाल – पुणे विभाग : 75 रिक्त जागा, नागपूर विभाग : 56 जागा
1] संविधानिक विद्यापीठाची कोणतीही पदवी.
2] मराठी टंकलेखन ३० शब्द प्रतिमिनिट व इंग्रजी ४० शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण.
3] इच्छुक उमेदवारांचे वय कमीत कमी 19 वर्ष व जास्तीत जास्त 38 वर्ष असावे.
एकूण रिक्त पदे : 131 जागा
नोकरीचे ठिकाण : पुणे विभाग व नागपूर विभाग
◾खालील जाहिरात डाउनलोड करून व्यवस्थित वाचून खाली दिलेल्या लिंकवरून ऑनलाईन अर्ज (पुणे विभाग – 30 जानेवारी 2025 व नागपूर विभाग – 09 फेब्रुवारी 2025) पूर्वी सादर करावेत.

इतर आवश्यक माहिती (Mahakosh Bharti other information)

निवड पद्धत : उमेदवाराची निवड लेखी परीक्षेद्वारे करण्यात येईल.
अर्जाचे शुल्क : खुला प्रवर्ग – 1000 रुपये,राखीव प्रवर्ग – 900 रुपये
◾अपुरे अर्ज किवां अस्पष्ट कागदपत्रे ऑनलाईन अपलोड केल्यास अश्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही व या बाबत कसल्याही तक्रारीची दखल घेतली जाणार नाही.

अधिकृत संकेतस्थळ : https://mahakosh.maharashtra.gov.in/
अर्ज करण्याची शेवटची तारीख : पुणे विभाग – 30 जानेवारी 2025 व नागपूर विभाग – 09 फेब्रुवारी 2025
◾अर्जात हेतुपुरस्सर खोटी माहिती देणे किंवा खरी माहिती दडवून ठेवणे किंवा त्यात बदल करणे किंवा पाठविलेल्या दाखल्यांच्या प्रतीतील नोंदीत अनधिकृतपणे खाडाखोड करणे किंवा खाडाखोड केलेले वा बनावट दाखले सादर करणे.

महत्वाच्या सूचना (Lekha Koshagar Vibhag Jobs important Instruction)

◾परीक्षा कक्षातील गैरवर्तन, परीक्षेचेवेळी नक्कल (copy) करणे, वशिला लावण्याचा प्रयत्न करणे यासारखे अथवा परीक्षा कक्षाचे बाहेर अथवा परीक्षेनंतरही गैरप्रकार करणाऱ्या उमेदवारांना गुण कमी करणे, विशिष्ट किंवा सर्व परीक्षांना वा निवडींना अपात्र ठरविणे इत्यादीपैकी प्रकरणपरत्वे योग्य त्या शिक्षा करणेचा तसेच प्रचलित कायदा व नियमांचे अनुषंगाने योग्य ती कारवाई करणेचे अधिकार अध्यक्ष, प्रादेशिक निवड समिती तथा सहसंचालक, लेखा व कोषागारे, पुणे विभाग, पुणे यांना राहतील.

◾तसेच विहित केलेल्या अर्हतेच्या अटी पूर्ण न करणारा अथवा गैरवर्तणुक करणारा उमेदवार कोणत्याही टप्प्यावर निवड होण्यास अपात्र ठरेल. तसेच निवड झाल्यानंतर देखील सेवा समाप्तीस पात्र ठरेल.

◾शैक्षणिक अर्हतेसंदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या क्रमाने नमूद करावी, संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक हा शैक्षणिक अर्हता धारण केल्याचा दिनांक समजणेत येईल व त्या आधारे उमेदवाराची पात्रता ठरविणेत येईल, गुणांऐवजी श्रेणी पद्धत असल्यास कागदपत्र पडताळणीचे वेळी उमेदवारांनी गुणपत्रकासोबत श्रेणीची (Grade) यादी सादर करावी.

PDF जाहिरात-पुणे विभाग येथे क्लिक करा
PDF जाहिरात-नागपूर विभाग येथे क्लिक करा

Similar Posts