Mahsul Vibhag Bharti 2025 : सरकारी विभागात जॉब शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे, महाराष्ट्राच्या महसूल आणि वन विभागामध्ये विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या तारखेअगोदर ईमेलद्वारे अर्ज सबमिट करायचे आहेत, ईमेल आयडी व इतर माहिती खाली दिलेली आहे.

भरतीचा विभाग : हि नोकरी महसूल व वन विभागामध्ये निघाली आहे,विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे
शैक्षणिक पात्रता : वर पदानुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून उमेदवाराने जाहिरात वाचून अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन ईमेलद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांचे नाव व आवश्यक अर्हता

  • अध्यक्ष – 01 जागा
  • सदस्य – 08 जागा

नोकरीचे ठिकाण : बृहन्मुंबई,पुणे,छत्रपती संभाजी नगर व नागपूर
◾वयोमर्यादा : वयोमर्यादेची माहितीसाठी मूळ जाहिरात वाचावी.
शेवटची तारीख : यासाठी अर्ज 07 मार्च 2025 पूर्वी ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : उप सचिव,कार्यसं-ज१अ,महसूल व वन विभाग,मादाम कामा रोड,हुतात्मा राजगुरू चौक,मंत्रालय,मुंबई-400032
ईमेल आयडी : j1a.revenue@maharashtra.gov.in

महत्त्वाच्या सूचना

◾महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) यांच्या अर्हता, त्यांच्या पदाची मुदत, सेवेच्या अटी व शर्ती, तसेच नियुक्तीची प्रक्रिया ही महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण नियम, २०२५ मध्ये नमूद केल्यानुसार असेल.
◾वेतन, भत्ते व इतर सेवाशर्ती या पुढील शासन निर्णयांमधील तरतुदींप्रमाणे असतीलः-
◾येथे यापूर्वी नमूद केलेल्या कार्यपध्दतीनुसार, महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरणाच्या उक्त नमूद केल्यानुसार रिक्त असलेल्या किंवा संभाव्य रिक्त होणाऱ्या अध्यक्ष, सदस्य (न्यायिक व प्रशासकीय) या पदांवरील नियुक्तीसाठी पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या इच्छुक व्यक्तींनी कोणत्याही एका रिक्त पदासाठी एक अर्ज याप्रमाणे त्यांचा तपशिल सोबत जोडलेल्या विहीत प्रपत्र व जोडपत्रात भरुन बंद लिफाफ्यात सादर करावा.

◾लिफाफ्यावर “महाराष्ट्र जमीन महसूल न्यायाधिकरण, अध्यक्ष / सदस्य न्यायिक / सदस्य प्रशासकीय) पदासाठी अर्ज” असे लिहून पोस्टाने उप सचिव, कार्यासन ज-१अ, महसूल व वन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२ किंवा jla.revenue@maharashtra.gov.in या ई-मेल पत्त्यावर ई-मेलद्वारे शुक्रवार दिनांक ०७/०३/२०२५ रोजी दु. ०२:०० वाजेपर्यंत पोहचतील अशाप्रकारे पाठवावेत.
◾राज्य/केंद्र शासन किंवा अन्य कोणत्याही संघटनेत सेवेत असलेल्या व्यक्तींनी त्यांचा तपशील विहित मार्गाने (प्रशासकीय मंत्रालय/ विभाग/राज्य / केंद्रशासित प्रदेश यांचे मार्फत) अंतिम दिनांकापूर्वी पाठवावा.

PDF जाहिरात व अर्जाची लिंक
📑PDF जाहिरात येथे क्लिक करा
🖱️अधिक माहिती येथे क्लिक करा

 

Similar Posts