Created by Swati, 27 March 2025

CMM Mumbai Bharti 2025 : मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई यांच्या स्थापनेवर सफाईगार/मेहतर पदांसाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यासाठी इच्छुक तसेच पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे अर्ज 16 मार्च 2025 पासून 01 एप्रिल 2025 संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत अर्ज स्वीकारल्या जाणार आहेत. हे अर्ज नोंदणीकृत पोस्टद्वारे किंवा स्पीड पोस्टद्वारे उमेदवारांनी पाठवायचे आहेत अर्जाचा नमुना जाहिरातीमध्ये दिलेला असून संपूर्ण जाहिरात व्यवस्थित रित्या वाचावि व त्यातील अर्जाचा नमुना डाऊनलोड करून व्यवस्थित रित्या भरून खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.

An advertisement has been published for the posts of Sweeper/Sweeper on the establishment of the Chief Judicial Magistrate’s Court, Mumbai and applications are invited from interested and eligible candidates. Applications will be accepted from 16th March 2025 to 01st April 2025 till 5:30 PM.

भरतीचा विभाग : मुख्य न्याय दंडाधिकारी यांचे न्यायालय मुंबई येथे भरती
भरतीचा प्रकार : सरकारी नोकरीची संधी
पदांचे नाव : सफाईगार/मेहतर
शैक्षणिक पात्रता : जाहिरातीमध्ये दिल्याप्रमाणे
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

🔺वरील लेखात माहिती अर्धवट असू शकते संपूर्ण माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी व अर्ज सादर करावा, कोणत्याच नोकरीसाठी आर्थिक व्यवहार करू नये. आमच्या मार्फत कोणालाच जॉबच्या ऑफर्सचे वैयक्तिक मेसेज पाठवल्या जात नाहीत कृपया ग्रुपवरील माहितीस प्राधान्य द्यावे.

◾पदांचे नाव व आवश्यक अर्हता
▪️सफाईगार/मेहतर – 07 जागा
1] जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्रता धारण केलेली असावी.
एकूण रिक्त पदे : 07 जागा
नोकरीचे ठिकाण : मुंबई
मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवाराला नियमानुसार 47600 रुपये मानधन दिल्या जाईल.

अधिकृत संकेतस्थळ :https://cmmmumbai.dcourts.gov.in/
अर्जाचे शुल्क : भरती प्रक्रियेकरिता कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नसून ती पूर्णपणे निशुल्क आहे, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क जसे की, दर्शनी धनाकर्ष (Demand Draft), प्रदानादेश (Pay Order) धनादेश (Cheque) इत्यादी जोडू नये.
शेवटची तारीख : दिनांक 01 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा. प्रबंधक, मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालय, महापालिका मार्ग, एस्प्लनेड, मुंबई ४०० ००१

उमेदवारांसाठी महत्वाच्या सूचना
◾उमेदवारांनी आपले अर्जासोबत स्वतःच्या नावासह संपूर्ण पत्ता असलेला लिफाफा १० रूपयाचे डाक टिकीट लावून तसेच दोन नुकतेच काढलेले पारपत्र (Passport) आकाराचे छायाचित्रासह (Photo) पाठवावा.
◾चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांनी पुढील प्रक्रियेकरिता त्यांना मिळालेले प्रवेशपत्र दिलेल्या तारखांना सोबत आणावे.
◾अपूर्ण अर्ज किंवा असा अर्ज, जो उमेदवाराने सादर केलेल्या तपशीलामुळे त्यास पदासाठी अपात्र ठरवेल तो अर्ज बाद ठरविला जाईल आणि त्याबाबत कोणतीही तक्रार ऐकली जाणार नाही.

PDF जाहिरात येथे क्लिक करा
अर्जाचा नमुना येथे क्लिक करा

Similar Posts