Gunthewari New GR : नागपूर मध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुकडेबंदी कायद्यातील सुधारणा संदर्भात विधेयक सादर केले आहे.

विधानसभा आणि विधान परिषदेच्या दोन्ही ठिकाणी एकमताने हे विधायक मंजूर करण्यात आले असून यामुळे आता यापुढे एक गुंठा, दोन गुंठे, तीन गुंठे, चार गुंठे अशी जमीन खरेदी करणे आणि विक्री करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे.

तुकडेबंदी कायदे 1947 रोजी अमलात आला होता यानुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र ठरविण्यात आले होते प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या हस्तांतरण करण्यास या कायद्याअंतर्गत निर्बंध आणले होते.

आता मात्र सर्वसामान्यांना खरेदी केलेले एक, दोन, तीन, चार, पाच गुंठा क्षेत्राचे नियमितिकरण करण्यास परवानगी दिली जाणार आहे. कशासाठी मिळणार परवानगी विहीर, रस्ता/घर बांधकाम करण्यासाठी या योजनेचा फार फायदा होणार आहे.

अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तुकडे बंदी विधेयकामध्ये केलेल्या बदलामुळे एखाद्याच्या शेतात घर बांधायचे असेल किंवा शेतात जाण्यासाठी रस्ता खरेदी करायचा असेल किंवा विहीर खोदकामासाठी एक गुंठा किंवा दोन गुंठे जमीन खरेदी करायचे असेल तरी कामात सोपी होणार आहेत जमीन खरेदी विक्री करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रमाणभूत क्षेत्र ठरवण्यात आले आहे.

जे ठरवून दिलेले क्षेत्र आहे त्यापेक्षा शेतकऱ्यांना जमीन विकता येत नव्हती किंवा खरेदी करता येत नव्हती आता एक गुंठ्याची खरेदी विक्री होणार असल्याने ही समस्या सुटली आहे.

किती टक्के शुल्क भरावे लागेल? (Gunthewari New GR)

प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राच्या खरेदी विक्रीस बंदी घालण्यात आली होती त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना ही डोकेदुखी झाली होती, बाजार मूल्याचा 25% रक्कम शासनात जमा करायची असल्याने अनेकांनी हे व्यवहार करणे टाळले होते.

आता मात्र बाजार मूल्याच्या फक्त 5 टक्के रक्कम शासनास भरून एक गुंठ्याची खरेदी विक्री करू शकणार आहात या संदर्भात अगोदर अध्यादेश काढण्यात आला होता याआधी देशाच्या अधिनियमात रूपांतर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विधानसभा व विधानपरिषद या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडले आणि ते मंजुरी करण्यात आले.

गुंठेवारी ही फक्त घर बांधकाम करण्यासाठी विहीर खोदकाम करण्यासाठीच असणार आहे हे नागरिकांनी ध्यानात घ्यावे या सर्व महत्त्वाच्या गोष्टी असल्यामुळे नक्कीच याचा नागरिकांना फायदा होणार आहे.

अधिकृत माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts