RTE Admission 2025 : पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची दरवाजे उघडणाऱ्या आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना अखेर अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. त्यानुसार पालकांना आपल्या मुलांचे अर्ज मंगळवार, दि. १४ ते २७ जानेवारी २०२५ दरम्यान भरता येणार आहेत.

आर्थिक दुर्बल आणि बंचित घटकांतील विद्याध्यांसाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार पहिली ते आठवीसाठी इंग्रजी शाळांमध्ये मोफत शिक्षणाची सुविधा उपलब्ध केली जाते. संबंधित विद्याध्यचेि शुल्क सरकारमार्फत संबंधित शाळांना शुल्क प्रतिपूर्तीच्या माध्यमातून देण्यात येते. यंदा प्रवेश प्रक्रियेसाठी १८ डिसेंबर २०२४ ला शाळा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली.

नोंदणीसाठी ३१ डिसेंबरची मुदत देण्यात आली. परंतु अपेक्षित नोंदणी न झाल्यामुळे ४ जानेवारीपर्यंत शाळा नोंदणीला मुदतवाढ देण्यात आली. सध्या आरटीई पोर्टलवर दिसत असलेल्या आकडेवारीनुसार ८ हजार ८४९ शाळांची नोंद झाली असून, १ लाख ८ हजार ९६१ जागा उपलब्ध झाल्या आहेत.

आरटीई प्रवेश प्रक्रियेत दरवर्षी सर्वाधिक जागा पुण्यात उपलब्ध असतात या वर्षी देखील प्रवेशासाठी ९५१ शाळांची नोंदणी झाली असून, १८ हजार ४५२ जागा उपलब्ध झाल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अर्ज सादर करण्याअगोदर तुमचा मुलगा/मुलगी पात्र आहे का नाही हे पाहण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि वयोमर्यादेची माहिती असणे आवश्यक आहे त्यासाठी खाली सर्व डिटेल्स दिल्या आहेत त्या वाचा अर्ज करा.

2025-26 साठी अर्ज कोण करू शकतो ? (RTE Maharashtra )

वय वर्ष 3+ पासून वय वर्ष 6+ पर्यंत आर्थिक वंचित गटातील मुले-मुली येथे अर्ज करू शकतात या नियमामध्ये बदल झाल्यास सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर मिळेल.

वयोमर्यादेची शासन निर्णय डाउनलोड करा

अर्ज करण्याची पद्धत (RTE Maharashtra Admission)

https://student.maharashtra.gov.in या पोर्टल वर जावे, सर्वप्रथम विद्यार्थ्यांची नोंदणी करून घ्यावी त्यानंतर जुना पासवर्ड बदलून घ्यावा. नवीन पासवर्ड ने लॉगिन करावे, विद्यार्थ्यांची मूळ माहिती भरावी व नंतर अर्ज भरावा अर्ज भरल्यानंतर जवळच्या शाळेची निवड करावी व अर्ज सबमिट करावा.

प्रवेशासाठी महत्त्वाची कागदपत्रे

  • पत्त्याचा पुरावा जसे की रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक, भाडेपट्टी, कर पावती, विजेचे बिल, पाण्याचे बिल इत्यादी.
  • आरक्षित संवर्गातून अर्ज करत असल्यास जातीचे प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. (उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही)
  • आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी पालकाचे उत्पन्नाचा दाखला देणे आवश्यक. (पालकाचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे)
  • विद्यार्थ्याचा जन्माचा दाखला
  • विद्यार्थी अपंग असेल तर अपंगत्वाचा दाखला.

अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा (नवीन GR नुसार )

(दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी कमाल वयोमर्यादा)

  1. प्ले ग्रुप / नर्सरी (इ. १ली पूर्वीच्या ३ रा वर्ग) – 3+ वर्ष
  2. इयत्ता १ ली – 6+ वर्ष

महत्त्वाच्या सूचना (RTE Admission 2025)

◾पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

◾आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्यावरीलच जन्म दिनांक लिहावा. एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही !

◾अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

Created by Anil Patil, Date-27.01.2025

Similar Posts